भोर l राजगड नव्याने उभारण्याचे स्व.थोपटे साहेबांचे स्वप्न पूर्ण करणार-माजी आमदार संग्राम थोपटे;३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर ; संतोष म्हस्के
अनेक वर्षांपूर्वी स्वर्गीय माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेबांनी शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी तसेच शेतकरी महत्त्वाचा केंद्रबिंदू मानून उजाड माळरानावर राजगड सहकारी साखर कारखाना उभा केला .तो अनेक वर्ष पूर्ण क्षमतेने चालवला. मध्यंतरीच्या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे  कारखाना बंद असला तरी पुन्हा नव्याने राजगड साखर कारखाना उभारण्याचे स्वर्गीय थोपटे साहेबांचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार असल्याचे मत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
     राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी आमदार थोपटे सोमवार दि.२८ बोलत होते.सभेचा अहवाल वाचून सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी उपाध्यक्ष पोपट सुके,संचालक उत्तम थोपटे,सुधीर खोपडे,शिवाजी कोंडे,पं.स.सदस्य रोहन बाठे,संचालक सुभाष कोंढाळकर,दिनकर धरपाळे,शोभाताई जाधव,चंद्रकांत सागळे,का.संचालक सर्जेराव पाटील,राजेंद्र शेटे,संपत दरेकर,सुरेश राजीवडे,अंकुश खंडागळे आदींसह संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी आमदार थोपटे पुढे बोलताना म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याच्या कर्ज मंजुरीचा दिलेला शब्द लवकरच साकार होणार असून सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून नव्याने साखर कारखाना उभारणार आहे.हा प्रश्न कोणाच्या खाजगी उद्योगाशी निगडित नाही.थेट शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी निगडित असल्याने प्रकल्प उभारणीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे.तर स्वर्गीय थोपटे साहेबांचे नव्याने साखर कारखाना उभारणीचे स्वप्न पुढील काही दिवसातच पूर्ण केले जाणार आहे.
To Top