सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकाप्रती असलेला आदर व लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार यांचेप्रती असलेला स्नेह व्यक्त करीत श्री क्षेत्र सोमेश्वर मंदीर येथे राख्या बांधून व्यक्त केला. फक्त राखी बांधली नाही तर त्यांनी सैनिकांना विनम्र नमस्कार देखील केला.
बारामती तालुका हाजी माजी सैनिक संघ मुख्य शाखा सोमेश्वर या संघटनेचे पूरग्रस्तांना मदतीचा चेक अजितदादाकडे सुपूर्द केला होता. त्यांचे सामजिक कार्य पाहून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या भर सभेत सॅल्युट ठोकला होता. आज सुनेत्राताई पवार मंदिरात दर्शनासाठी आल्या असता आजी माजी सैनिक संघटनेचे संस्थापक जगन्नाथ लकडे, तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष गणेश आळंदीकर, अध्यक्ष ताराचंद शेंडकर, उपाध्यक्ष भगवान माळशिकारे, राजाराम शेंडकर, गणेश शेंडकर, लहू होळकर, राजेंद्र पवार, विजय साबळे इत्यादी सैनिकांनी सुनेत्राताताई पवार यांची भेट घेतली त्यावेळी प्रतिनिधींना सुनेत्राताई यांनी राख्या बांधल्या. बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष युवराज खोमणे यांना पत्रकार प्रतिनिधी म्हणून राखी बांधली.पत्रकार संतोष शेंडकर, महेश जगताप, गणेश आळंदीकर यावेळी हजर होते.
धावपळीचा व्यस्त कार्यक्रम असताना देखील उपमुख्यमंत्री सुनेत्राताई नी देशाप्रती असलेला आदर व सैनिकाप्रती असलेले प्रेम व्यक्त करीत हा अनोखा कार्यक्रम पार पाडला. पत्रकारांचे देखील लोकशाहीत मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
