सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : पंढरीनाथ शिंदे
पुरंदर तालुक्यातील महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीपदी कोळविहिरे गावच्या कन्या डॉ. अपेक्षा प्रगती पंढरीनाथ शिंदे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.
डॉ. अपेक्षा शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण भोर नगरपालिकेच्या श्री राष्ट्रसंत गाडगे महाराज प्राथमिक शाळेत झाले. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण भोर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झाले. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी लातूर येथे वर्षभर क्लासच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी केली. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात तसेच पुणे येथील रुबी हॉल येथे त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. वडील आरोग्य विभागात कार्यरत असल्याने लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली होती. अभ्यासातील सातत्य, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न साकार केले.
कोळविहिरे गावच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी होण्याचा मान डॉ. अपेक्षा शिंदे यांना मिळाला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जेजुरी तसेच कोळविहिरे परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. अपेक्षा शिंदे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील वाटचालीत खान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. इम्रान लतीफ खान तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रेय हरिदास धोत्रे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव राजेंद्र कुडले, पी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे व रूपाली अमोल झेंडे, पुरंदरचे सभापती अमित झेंडे, पंचायत समिती सदस्या स्मिताताई निगडे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संतोष आबा निगडे, आंबळे गावचे माजी सरपंच पांडुरंग जगताप, पुरंदरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, भोरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, अॅड. राजेंद्र खोपडे, लेखा अधिकारी प्रमोद निगडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, माजी पशुधन विकास अधिकारी डॉ. तानाजी काकडे, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी प्रकाश निगडे, सामाजिक कार्यकर्ते विजय निगडे, एकनाथ शिंदे, पोलीस पाटील सोनाली कुदळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल कुदळे, उद्योजक प्रशांत शिंदे, धनंजय कुदळे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
अभ्यासातील सातत्य, जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे डॉ. अपेक्षा शिंदे यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
