सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुणे-पंढरपूर मार्गावरील सासवड बायपास परिसरात शुक्रवारी (दि. ४) सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकी घसरून डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात सौरभ संभाजी जेधे (वय २३, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला.
सौरभ जेधे हे पुणे येथे नोकरीला होते. कामावरून घरी येत असताना सासवड बायपास परिसरात त्यांचे वाहन घसरले. यावेळी डिव्हायडरवर त्यांचे डोके आदळल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे जेधे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सौरभ यांच्या पश्चात आई-वडील, आजी, भाऊ, दोन आत्या, तीन चुलते आणि तीन चुलत भाऊ असा परिवार आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
