सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर | प्रतिनिधी
होळ (ता. बारामती) गावठाण येथे सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने वाल्हे ते होळ पायी ज्योत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी सहा वाजता महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या मूर्तीचे पूजन व आरती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे API जीवन मोहिते यांच्या हस्ते करण्यात आली.
यानंतर सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मंडळाचे कार्यकर्ते प्रशांत धुमाळ, पिलाजी धुमाळ, अजित सूर्यवंशी, सुरज ढगारे, संभाजी धुमाळ, वाल्मिक धुमाळ, अमृत धुमाळ, कुंडलिक, बाबुराव, सनी, सागर, समीर, रियाज, सचिन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे होळ गावठाण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.




