सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे - सातारा महामार्गावरील वेळू ता.भोर येथील उड्डाणंपुलाच्या कठड्याला भरधाव दुचाकी धडकून दुचाकीस्वार तरुण थेट पुलावरून खाली सेवा रस्त्यावर पडल्याने अपघात झाला.दरम्यान या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मृत्यू झालेला दुचाकीस्वार संतोष बगले (रा. कात्रज पुणे) येथील असून अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य करत अपघातग्रस्ताला उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात पाठवले. मात्र बगले ह्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दुचाकी साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला असून अपघात ग्रस्त व्यक्तीची दुचाकी उड्डाण पुलावर अडकून राहिली व दुचाकीस्वार उंचावरून रस्त्यावर पडल्याने मृत पावला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
