सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : सोमनाथ साखरे
मेढा - मुंबई विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत स्वतःच डिपॉझिट जप्त होणाराने राज्यात एक नंबरचे मतदान घेणाऱ्या शिवेंद्रसिहराजे भोसले याच्यावर गरळ ओकताना स्वतःची लायकी ओळकावी. ठेकेदार, रस्ता, माज, मस्ती अशी गरळ ओकताना आपण मराठा मोर्चाच्या कामात वाशी मुंबई येथे कोणाचा ठेका घेतला, कोणत्या वेगळ्या पद्धत्तीने माया गोळा केली याच उत्तर पहिले जावलीकरांना द्यावे याबाबतचे प्रसिध्दी पत्रक जावली तालुका भाजप व नगराध्यक्ष यांचेवतीने प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की, मेढा नगरीच्या छ.शिवाजी महाराज चौकामध्ये आदरनिय छत्रपतींच्या घराण्याबद्दल गरळ ओकताना अंकूश कदमांनी आपली स्वतःची उंची, लायकीची जी पातळी ओलां ओलांडून बेताल वक्तव्य केले त्याचा आम्ही नगरपंचायत व भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेद करतो असेही म्हटले आहे.
ज्यांना विधानसभा निवडणूकी मध्ये स्वतःचे डिपॉझीट वाचविता आले नाही त्यांनी आमचे दैवत श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विषयी बोलु नये. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे चार वेळा विधानसभेला निवडून आले त्या वेळेला आपल्याला मतदानाचा अधिकार ही नव्हता ते आपण विसरला का? असा टोला ही पत्रकात नमुद केला आहे.
जावलीचा सुपुत्र म्हणून सारख बोलता मग जावलीच्या विकासासाठी काय केल त्यावर बोला. महाराज साहेब आमचे दैवत आहेत. अकुंश कदम कुठ इंद्राचा ऐरावत अन कुठ श्याम भट्टाची तहानी अशी तुलना करून महाराज साहेबांच्या वर बोलाल तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा सज्जड इशारा प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातुन देण्यात आला आहे.
प्रसिद्धी पत्रकावर विकास देशपांडे, शिवाजीराव देशमुख, शिवाजी गोरे, धनंजय पवार, संतोष वारागडे आदींच्या सह्या आहेत.





