बारामती l अंजनगावच्या बबुराव आण्णा व श्री गणेश वि का सोसयटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमन निवड बिनविरोध


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

माळेगाव : प्रतिनिधी

येथील बबुराव आण्णा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आणि श्री गणेश विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड बिनविरोध पार पडली. बाबुराव आण्णा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी  चंद्रकांत मधुकर परकाळे, तर व्हाईस चेअरमनपदी  सुलोचना नामदेव वायसे यांची बिनविरोध निवड झाली.

तसेच श्री गणेश विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी  अरविंद शंकरराव परकाळे, तर व्हाईस चेअरमनपदी  शहाजी जगन्नाथ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीनंतर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बारामती येथील दुर्गुडे आणि पद्मश्री शिंदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी  दिलीप परकाळे, दादासाहेब मोरे, नामदेव परकाळे, सुभाष वायसे, सुभाष परकाळे, जालिंदर वायसे, बाळासाहेब मोरे, सुदाम परकाळे यांच्यासह दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top